बालकविता -
सोनूची गंमत...
केस कापून घ्यायची
भिती खुप वाटायची
कान टाकतील कापून
म्हणून बसायचा लपून
बाबा शोधून आणायचे
खुर्चीवर मग बसवायचे
न्हावीकाका ते धाकवून
ओरडत डोके वाकवून
आहे तुला का अक्कल?
करीन तुझे टक्कल
सोनू बसता घाबरुन
काढले केस भादरून
कात्रीने केले करकर
वस्तरा फिरतो खरखर
केस कापता कराकरा
सोनू लागला दिसु बरा
जयवंत जाधव, कोवाड
मोबा . 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा