बालकविता -
शाळेतले वनभोजन
बागेत जाताना फिरायला
हुरुप आला अंगात
दंगा मस्ती सुरू झाली
जाईना कुणीच रांगेत
बसुन हिरव्या बागेत
गुरुजी गोष्टी सांगत
गंमत वाटली साऱ्यांना
जेव्हा सोनू होता पेंगत
खेळ खेळतांना आले
सारेच खुप रंगात
वेगवेगळे खेळ खेळलो
किती तरी ढंगात
हसत खेळत उठलो जेव्हा
एकमेकांच्या संगत
सोनू सोनीला मजा वाटली
पाहून एकच पंगत
श्री. जयवंत जाधव, कोवाड
मोबाईल 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा