बालकविता
इवली इवली सोनी
इवल्या इवल्या सोनीचे
इवले इवले ओठ
इवल्या इवल्या ओठावर
इवले इवले बोट
इवल्या इवल्या सोनीचे
इवले इवले पोट
इवल्या इवल्या पोटात
दुधाचा घोट
इवल्या इवल्या सोनीचे
इवले इवले पाय
इवल्या इवल्या पायाने
तुरुतुरु जाय
इवल्या इवल्या सोनीचे
इवले इवले नाक
इवल्या इवल्या नाकाला
इवला इवला बाक
इवल्या इवल्या सोनीचे
इवले इवले गाल
इवल्या इवल्या गालाचा
रंग लाल लाल
इवल्या इवल्या सोनीचे
इवले इवले डोळे
इवल्या इवल्या डोळ्यांत
भाव किती भोळे
-- जयवंत जाधव, कोवाड
मोबा. _ 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा