*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२३१)
इटलीच्या नावडत्या किटलीतील
जरी चहा कडक गरम आहे.
पिताना त्यांच्या मनातल्या मनात
वाटते थोडी बहुत शरम आहे.
२३२)
धनुष्याचा धारदार बाणच
बनला घडयाळाचा काटा आहे.
धनुष्याच्या टणत्कारापेक्षाही
घडयाळाचाच गजर मोठा आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा