Friday, July 24, 2020

कविता - खास

वास???
नव्हेच.
खास अत्तर
जणू देह तुझा राणी.

भास???
नव्हेच.
आस मिलनाची
दुसरे काय आणि?

बास???
नव्हेच.
हास आणखीन
चमकू दे दंतमनी.

घास???
नव्हेच.
फास अडकला 
आठवण येता मनी .

खास???
नव्हेच.
श्वासच तू ग माझा
श्वासात तुझीच गाणी

ठास???
नव्हेच.
वास कर ह्रदयी
युगे युगे सर्व क्षणी.


श्री. जयवंत जाधव, कोवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल -9403463881

No comments:

Post a Comment