*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२१८)
जनतेशी नाही मुळीच देणंघेणं
फक्त खुर्चीसाठीच त्यांचा खेळ आहे.
सामान्य जनता झालीय हतबल
आता फक्त पश्चातापाचीच वेळ आहे.
२१९)
नैतिकतेबाबत बोलायचं
आता कुठं काय उरलं आहे?
समोर येऊदेच एकदा ते
जे तुमच्या तुमच्यात ठरलं आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा