शुक्रवार, २४ जुलै, २०२०

बालकविता - सोनीच्या स्वप्नात

बालकविता
सोनीच्या स्वप्नात

सोनीनं पाहिलं एकदा
भूताचं घर
खालती छप्पर आणि
जमीन वर

भूताचे डोळे म्हणे
होते ते मागे
छान छान गोष्टी तो
नाकाने सांगे

लांब नखे बोटांना
उलटे पाय
वाट्टेल ते एका दमात
कच्चेच खाय

एक एक टांग त्याची
शंभर फुट
झाडांच्या सालींचे म्हणे
सुंदर बुट

लांब लाल जीभ आणि
लांबडे सुळे
सोनीला पाहून म्हणे
भूतच पळे

झोपेतून सोनी उठता
भल्या सकाळी
स्वप्नातील भूत आठवता
खुलली कळी

          जयवंत जाधव, कोवाड
          मोबा. 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा