पाने
माडाच्या झाडाचे
पान तलवार
ऊसाचेही पान
लांब धारदार
भले मोठे पान
लांबट केळीचे
इवलेसे पान
आंबट चिंचेचे
पान रबराचे
जाड किती वाटे
निवडुंगाची त्या
पाने झाली काटे
एरंडाचे पान
आकाराने तारा
सगुणेचे पान
स्पर्श खरखरा
आळू मखमली
ना पाणी टिकतं
कमळाच्या पाना
ना पाणी डसतं
वनस्पतीची पाने
विविध गुणाची
नटली ही वने
किमया कुणाची ?
जयवंत जाधव, कोवाड
ता.चंदगड जि. कोल्हापूर
मो .9403463881
'पाने'
ReplyDeleteअभ्यासक्रमात समाविष्ट करण्यायोग्य आहे.