रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता - दौड

दौड


धगधगती अशी होती
ज्वलंत एक आग
शिवछत्रपती गर्जा सारे
हा सह्याद्रीचा वाघ

दौड त्याची घोड्यावरची
वाऱ्यापेक्षा वेग
चपळाई तर अशी जणू
सळसळणारा नाग

तेजतर्रार जवान गुणी
अंगात होती रग
भाळून सारे शूर मावळे
धावले त्याच्या मागं

युक्ति आणि शक्तीचा
करून उपयोग
शौर्य आणि दरारा मोठा
हादरला शत्रुचा भाग

गांजलेल्या भाळावरचे
पुसून टाकले भोग
हाच आमचा जाणता राजा
रयतेला आली जाग

देव देश आणि धर्मासाठी
केला मोठा त्याग
नैतिकतेची थोरवी मोठी
नाही कसला डाग

एक दरारा राहिल कायम
किती संपतील युगं
शिवराय आमचे दैवत
जगात एकच वाघ

जय भवानी जय शिवराय
गर्जा माझ्या संग
जय भवानी जय शिवराय
गर्जा माझ्या संग

     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा