विश्वरत्न
मिळायची वागणूक सापत्न
त्याकाळी जन्मले एक रत्न
दिला लढा अखंड प्रयत्न
बाबासाहेब ते झाले विश्वरत्न
पिढीतांची होती वाताहात
कितीतरी होती जातपात
बाबासाहेब येत झंजावात
मान मिळवून दिला समाजात
चिड मंत्र तंत्र कांडाची
धार्मिक अंधानुकरणाची
बुरसटलेल्या त्या मनुची
बुद्धांवर निष्ठा भिमरायाची
राष्ट्रीयत्वाचे ते मूलाधार
पददलितांचे पालनहार
घटनेचे एक शिल्पकार
ते बाबासाहेब थोर फार
स्वातंत्र्य समता आणि बंधुता
आणली लोकशाही प्रजासत्ता
भारत एकसंघ नांदतो आता
वंदनीय बाबा साऱ्या भारता
©जयवंत जाधव,कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मो 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा