बागेतील पहाट
बागेमध्ये भल्या सकाळी
रंगीत फुले कशी उमलली
पहा पहाटे गार वारा
शुभ्र धुक्यांचा हा फवारा
बाग बहरली ही फळांची
आंबट तुरट गोड चवींची
खेळण्यासही किती हिरवळ
पायाना वाटे मऊ मखमल
नृत्य करती कारंज्या रंगीत
ताल घेली ऐकून संगीत
सुंदर दिसे किती नजारा
आवडतो साऱ्या पोरां थोरा
पहाटे सारे तुम्ही या ना
आपण ऐकू पक्षांचा ताना
©जयवंत जाधव,कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मो 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा