Sunday, August 9, 2020

कविता - गुरुजींची व्यथा

व्यथा गुरुजींची

बास झालं ज्ञान दान
मन खुप थकलय
सर्वाना समजाऊन
तोंड माझं सुकलय

रोजरोज नवीन धोरण
मन नाती रमत
सुधारणांच्या फक्त गप्पा
नाही आता सोसत

नको नापास नको धाक
धोरण हे शासनाचे
गांभिर्य नाही मुलानाच
पण बोल पालकांचे

चुकले तरी बोलणेही
झाले आता अवघड
पालकांचेच उलटे बोल
किती ऐकू बडबड

छडीलाही गप्प केले
तिलाही नाही किंमत
शिक्षकांवर धावायची
मुलांना आलीय हिंमत

गल्ली बोळ आणि चौकात
फक्त पगाराच्या बाता
काम त्यांना दिसत नाही
वैताग आलाय आता

पूर्वी ना कागदी घोडे
होतो फक्त शिकवत
सर्व्हेसाठी आता शासन
वर्गात नाही टिकवत

म्हणून म्हणतोय आता
मन खुप थकलय
सर्वांना समजाऊन
तोंड माझं सुकलय

     जयवंत जाधव कोवाड
     ता . चंदगड जि कोल्हापूर
     मोबाईल9403463881

No comments:

Post a Comment