रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता -चक्रव्युव्ह

चक्रव्युव्ह

पाहिजे असेल नोकरी
जाहिरात आधी वाचा
अटींच्याच पहा ओळी
बंद होईल तुमची वाचा

पाहिजे म्हणतात आधी
अनुभव या कामाचा
काम नाही म्हणून आहे
अभाव अनुभवाचा

पाठ सोडत नाही आता
आमच्या वयाची अट
बिकट करुन सोडली
पुढे जगायची वाट

शासन संस्था कंपन्यानी
बांधलाय आता घाटा
नोकरी मिळेल त्यालाच
जो देईल गांधीछाप नोटा

       ©जयवंत जाधव,कोवाड
       ता चंदगड जि कोल्हापूर
       मो 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा