Sunday, August 9, 2020

कविता होळी

होळी

फाल्गून मास
होळीची आस
होळी खेळूया,आम्ही होळी खेळूया

सावरी खांब
रोऊनी लांब
बोंब मारुया, आम्ही होळी खेळूया

घेऊनी डफ
मारुनी थाप
नाद काढूया, आम्ही होळी खेळूया

जाळूया होळी
खाऊया पोळी
सारे नाचूया, आम्ही होळी खेळूया

होऊनी गोळा 
उडवू धुळळा
मजा करुया, आम्ही होळी खेळूया

उधळू रंग
सोबत्या संग
सारे भिजूया, आम्ही होळी खेळूया

घेऊया सोंग
होऊया दंग
रात जागूया, आम्ही होळी खेळूया

चांगले पाळू
वाईट जाळू
जागे होऊया, आम्ही होळी खेळूया


      ©जयवंत जाधव,कोवाड
       ता चंदगड जि कोल्हापूर
       मो 9403463881

No comments:

Post a Comment