रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता - काळे घन

काळे घन

पायी पसरले निखारे
वाहतात किती उष्ण वारे
उघडले भूमीने वदन
कुठे पळाले हे काळे घन ?

गळून पडती फुले पाने
तरु जळाले तप्त उन्हाने
निर्झर मागतात जीवन
कुठे पळाले हे काळे घन ?

भास्कर तळपतो अजूनी
प्राणी शोधतात जल वनी
शेतकरी झाला आहे खिन्न
कुठे पळाले हे काळे घन ?

     ©जयवंत जाधव कोवाड
     ता . चंदगड जि कोल्हापूर
     मोबाईल9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा