रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता - एक भक्त

एक भक्त

ध्यान नि नामस्मरण
केली घोर तपस्या
ईश्वराचे दर्शन होईल 
मनात वेडी आशा

कितीतरी पुण्याईने 
सर्वांशी मी वागलो
व्रत आणि वैकल्यात
खुप यातना भोगलो

मन निर्मळे करुन
माया मोह त्यागलो
हिन दीन पिढीतांच्या
सेवेमध्ये लागलो

साऱ्या धर्मामध्ये किती
देवासाठी झटले
त्यांनाही अजून कसे
देव नाही भेटले ?

आता मात्र शंका येते
खरंच असेल देव ?
राक्षसाना दर्शन देतो
माणसाचं का भेव ?

       ©जयवंत जाधव,कोवाड
       ता चंदगड जि कोल्हापूर
       मो 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा