रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता - होरपळ

होरपळ

उना
जावखेड
खैरलांजीसारखे
नवीन ज्वालामुखी
जागृत होत आहेत .
ज्वालारस खदखदतोय आतल्या आत
संधी पाहतोय कवचे कमकुवत होण्याची
उफाळून बाहेर येण्याची
जाळून टाकण्यासाठी पूर्वी सारखच
पिढीत जीवांना .
नाही थोपवलं वेळीच
जीव जातील कैक
समजावलं पाहिजे,
'तू ज्या मातीचा,त्याच मातीचा मीही.'
मग का होरपळ ?
घरांची,झोपड्यांची
आणि .. 
आणि ..
निष्पाप जीवांची


©जयवंत जाधव, कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मो 9403963881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा