Sunday, August 9, 2020

कविता

लग्न सोहळा

काळ्या काळ्या ढगांचे
छत पसरले लांब
मधे मधे लावलेले
किरणांचे छान खांब

वारा वाजवी पिपाणी
मेघ वाजवतो ढोल
वीजा काढतात फोटो
नाचे झाडी डोल डोल

मेघकडा तेजोमय
जशी मांडवा झालर
पाऊस जणू अक्षता
कधी वाटे मोतीहार

     ©जयवंत जाधव,कोवाड
     ता . चंदगड जि कोल्हापूर
     मोबाईल9403463881

No comments:

Post a Comment