रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे २५२ ते २५५

[02/08, 6:20 PM] Jayvant Jadhav: *वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

२५२)
पटानुसार शिक्षक नेमणूक
फसवे शासनाचे धोरण आहे.
वर्गानुसार शिक्षक नसेल तर
शिक्षणाचेच आता मरण आहे.

२५३)
ऑन लाईन शिक्षणातच 
आता मूळीच कुठे नेट आहे ?
गरिबीच्या मोबाईल वर
'अर्था'विना रेंजसाठी वेट आहे.

२५३)
शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय
आता रोज नवा एक फतवा आहे.
'वाटोळं' आणि घोटाळा हाच आता
शिक्षणाचा ठरतोय  मितवा आहे.

२५४)
नवे अधिकारी तसे नवे उपक्रम
प्रमोशनसाठी नेत्यांवर इम्प्रेशन आहे.
आऊटपुट झिरो नि अपयश हिरो
याने शिक्षक विद्यार्थ्यांत डिप्रेशन आहे.

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा