Sunday, August 9, 2020

कविता - स्वाभिमान

स्वभिमान

कुणापुढे वाकणार नाही
कुणापुढे झुकणार नाही
स्वाभिमानं या
तारलं काय?
माझ्याकडं बघ
सायबापुढं झुकलो मी
पाहिजे तेवढे फेकलो मी
मला कुणी
मारलं काय ?

सायबाचं थोडं ऐकलं असतास
छोटासा तुकडा फेकला असतास
तर तुझं बिघडलं
असतं काय ?

माझ्याकडे बघ
सगळे दाखले,सगळे अर्ज
सबसिडीसह मिळाले कर्ज
सगळीच झाली कामं
तुझ्या सारखं केलं असतं
तर सारं हे घडलं
असतं काय ?

ध्यानात ठेव, 
लाचखोराला सोन्याचा घास
सत्याच्या नशिबी गळ्याला फास
साऱ्या जगात असंच असतं
आता तरी कळलं काय?
खरं सांग मित्रा तूला
स्वाभिमानानं
तारलं काय ?

     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881

No comments:

Post a Comment