पहाट
पक्षी पाखरे
जागी झाली
किलबील किलबील
गाऊ लागली
गाई वासरे
तयार झाली
हंबरत हंबरत
गाण्या भूपाळी
बाया माणसे
उठून बसली
हरे राम हरे राम
गाऊ लागली
उरका काम
आपले सारे
पटपट पटपट
तुम्ही उठा रे
©जयवंत जाधव,कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मो 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा