रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता - दवबिदू

       
       दवबिंदू

भास्कर राजा येताक्षणी
गेली लाजून धुके राणी

पळू जाता खाली सांडले
मोती तिच्या ओट्यामधले

छोटे तरु गवत पाते
त्यावर मोती चमचमते

नयन माझे गेले दिपून
रंग इतके आले कोठून

आताच होते इथे दिसत
लपले ते कुठे क्षणात ?


      ©जयवंत जाधव,कोवाड
      ता चंदगड जि कोल्हापूर
      मो 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा