नसती उठाठेव
तेव्हाही होती जीवसृष्टी
जेंव्हा नव्हता तुझा धर्म
नव्हता तुझ्या धर्माचा संस्थापक
तेंव्हाही प्रत्येक जीव जगतच होता
मग
त्या जीवांना
चारलं कोण ?
तारलं कोण ?
मारलं कोण?
होतं कुणीतरी,
तुझ्या धर्माआधी, नियंत्रण ठेवणारं
लक्षात ठेव,
मारु नको फुशारकी फुकाची
माझाच देव श्रेष्ठ
माझाच धर्म श्रेष्ठ मानण्याची .
कशाला धर्मांतर बळजबरीचे
सारे जग एकाच धर्माचे करण्याचे ?
हमी देणार ?
' पुन्हा नाही विभागणार. '
एक माणूस तरीही विचार दोन
मग या कोटींची मोळी बांधणार कोण ?
कारण,
सारेच झाले *हिंदू*
शैव वैष्णव विभागलील .
सारेच झाले *मुस्लिम*
शिया सुन्नी विभागतील .
सारेच झाले *ख्रिश्चन*
कॅथालिक पोटेस्टंट विभागतील
*जैन* आणि *बौद्ध* धर्मही
पंथा पंथात विभागतील.
कशाला मग,
नसती उठाठेव .
सारे एक पुन्हा दुही
सारे एक पुन्हा दुही
किती वेळा ?
©जयवंत जाधव, कोवाड
ता .चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल 9403463881
No comments:
Post a Comment