मधमाशी
भल्या पहाटे उडून जाते
नेहमी सत्वर
आळस नाही तिला कधीही
असते तत्पर
तऱ्हेर्हेच्या फुलां भेटण्या
नाहीच कंटाळा
खण्या खण्याचे घर बांधते
हा मधाचा पोळा
गुंजत जाते गोळा करण्या
गोड मकरंद
सुरेल त्याच्या गाण्याने होती
फुले फुले धुंद
कण मधाचे साठवून ती
उपाशी रहाते
कारण आम्ही लबाड कोल्हे
चाखतो आयते
नका खाऊ फुकट कुणाचे
नको कुणा त्रास
कष्ट करुनी मिळतो तोच
गोड माना घास
©जयवंत जाधव, कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मो 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा