Sunday, August 9, 2020

कविता - अर्थसंकल्प

अर्थसंकल्प

अर्थमंत्री झालो स्वप्नी
एक केला संकल्प
बनविण सर्वांच्या हिताचा
असा अर्थसंकल्प

पहिल्यांदा वाढविण मी
त्या पेट्रोलाचे भाव
चैनीखोर वाहनांची मग
कमी होईल धाव

डिझेलाचे दर ठेवीण
एकदमच रास्त
बस व माल वाहतूक
होईल खुप स्वस्त

बस प्रवासी वाढण्याने
रस्ते होतील कारमूक्त
ट्राफिकही कमी होईल
वातावरण प्रदुषणमुक्त

महाग करीन दारु नि
वस्तूही तंबाखुच्या
व्यसनाला बसेल चाप
ना चिंता आरोग्याच्या

किती माल कुणा विकला
कंपनीच सांगेल
करबुडव्या व्यापाऱ्यांचे
इनकम कळेल

कामे करता विकासाची
ठेवीन चांगला दर्जा
मुदती आधी खराब होता
देईन मोठी सजा

बेहिशेबी मालमतांची
करीन मी जप्ती
वसुल करून मोठी कर्जे
वाढविण देशाची प्राप्ती

स्वप्नातील अर्थसंकल्प
होईल तेव्हा खरा
झोपेतून जागे होऊनिया
निवडू नेता बरा

   ©जयवंत जाधव, कोवाड
   ता चंदगड जि कोल्हापूर
   मो 9403463881

No comments:

Post a Comment