सुगी
सुगी आली सुगी आली
कंबर आता बांधा
मळणीचा आला हंगाम
चांगली संधी साधा ॥ धृ ॥
रानात आली बाया माणसं
कापू लागली लोंब कणसं
पेंढ्या सारे बांधा ॥ १ ॥
मळणीचा आला हंगाम
चांगली संधी साधा ॥ धृ ॥
भात नाचना मके जोंधळे
मळण्यासाठी तयार खळे
लावू खांद्याला खांदा ॥ २ ॥
मळणीचा आला हंगाम
चांगली संधी साधा ॥ धृ ॥
मळणी यंत्रे, फिरवा बैले
होतील सारे दाणे वेगळे
रास धान्याची बांधा ॥ ३ ॥
मळणीचा आला हंगाम
चांगली संधी साधा ॥ धृ ॥
धान्याचे घेऊ भरून सुप
वारा सुटला वेगात खुप
करा उफणनी आता ॥ ४ ॥
मळणीचा आला हंगाम
चांगली संधी साधा ॥ धृ ॥
गोळा करूया टपोरी दाणे
डोळे भरले पाहून सोने
धान्याची पोती बांधा ॥ ५ ॥
मळणीचा आला हंगाम
चांगली संधी साधा ॥ धृ ॥
©जयवंत जाधव, कोवाड
ता . चंदगड जि कोल्हापूर
मोबाईल9403463881
No comments:
Post a Comment