महाभारत
होय इथे महाभारत घडते आहे ॥
कुणा नकोय मुलगी आता
कोण होताच कुमारी माता
'कर्ण अर्भक ' कुंतीचे 'त्या '
कचरा कुंडीत अजूनही 'रडते ' आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥
डोनेशनवाले ते द्रोणाचार्य
श्रीमंतासाठीच शिक्षण कार्य
एकलव्य नि कर्णाचे शौर्य
संधीअभावी अजून 'सडते' आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥
टपले दुःशासन पदोपदी
कित्येकीची तर होतेय द्रौपदी
भिष्म, धृतराष्ट्र उबवती गादी
इथे सत्तेची नशा अजून 'चढते' आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥
सत्तेसाठी भाऊ भांडले
कृष्णकुटील डाव मांडले
हिरावले ' कवच कुंडले '
त्या सुतपुत्रांचे चाक भूमीतच 'रुतते'आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥
कुठे काळा कुठे गोरा वर्ण
कुठे दलित आणि कुठे सवर्ण
समोरासमोर सर्वच धर्म
कार्यात अजूनही जात 'नडते' आहे
होय इथे महाभारत घडते आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥
जयवंत जाधव , कोवाड
ता. चंदगड जि.कोल्हापूर
मोबाईल 9403463881
No comments:
Post a Comment