रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता -भास

भास
असतात मोराला
रंगीबेरंगी पिसे
म्हणतो कसा कोंबडा
तो व मी एक दिसे
पवन सम घोडे
धावतात कसे
म्हणतोय गाढव
तो व मी एक दिसे
गोड गळा कोकीळा
रंगही काळा असे
म्हणतोय कावळा
तो व मी एक दिसे

दिसण्या दिसण्यात
सारखे भासती
गुण साऱ्यांचे पण
वेगळेच असती

      
       ©जयवंत जाधव,कोवाड
       ता चंदगड जि कोल्हापूर
       मो 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा