शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे २४१ ते २४४

वात्रट ठोसे
( वात्रटिका )

२४१ )
अध्यात्म कमी  आर्केस्ट्राच जादा
असं त्यांचं किर्तन आहे..
संत कमी  व्यावसायिक जास्त
असंच थोडं वर्तन आहे..

२४२)
आपलं ठेऊन झाकून
दुसऱ्याचा पोल खोलत आहेत.
संतानाही लाजवेल असे
थोडं वात्रट बोल बोलत आहेत.
२४३)
यांचे गलेलठ्ठ मानधन पाहून 
तुकाराम गाडगेबाबाही लाजले आहेत.
त्यांनी भजले कर्माला नि सेवेला
यानी फक्त प्रसिद्धी,पैसे पूजले आहेत .

२४४)
पैशाशिवाय अध्यात्मावर
एकही शब्द बोलत नाहीत..
हजारोंच्या विड्यात पाच रुपयेही
कमी असुन चालत नाहीत..

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा