रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता - अजूनही

अजूनही

गावंदर पालथी घातलेली गुरंढोरं
ओलांडतात तुमच्या घराचा उंबरठा
अगदी आतल्या गोठ्यापर्यंत
चार खोल्या ओलांडून
आणि
गाव भटकून आलेलं,
मेलेल्या जनावरांचं
लचके तोडणारं,
हाडं चघळणारं, 
कुत्रं
बसतं तुमच्या पंगतीला
अगदी कौतुकानं .
मात्र
चालत नाहीत
तुम्हा माणसांसारखीच माणसं
तुमच्या घरातच नाही तर, 
पंगतीला आणि संगतीलाही
अजूनही
कुठे कुठे
फक्त
दलित म्हणून ...!

     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा