रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता - किनारा

नदीचा किनारा

शिषिर वसंत मासी
नदीच्या सुंदर काठी
हिरवळ दाटली छान
सुमने फुलली कोटी

किनारी येतात लाटा
लहरती वेली झाडी
पाहण्या छबी पाण्यात
कशी डोकावली थोडी

काठावरच्या झाडीवर
घरटी ही लोंबतात
पक्षांची देखणी पिल्ले
त्यात गात खेळतात

पक्षी मारतात सूर
खोल गढूळ पाण्यात
भय वाटते माशांना
जीव नाही रे जीवात

पडताच बिया पाने
गोल उमटे तरंग
रवी किरणांनी लाटा
चमकती सप्तरंग


      ©जयवंत जाधव,कोवाड
       ता चंदगड जि कोल्हापूर
       मो 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा