Sunday, August 9, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे २४८ ते २५१

[02/08, 5:59 PM] Jayvant Jadhav: *वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

२४८)
सगळे राबले तरच घर चालतं
सगळ्यांना हे उमजलं पाहिजे.
देश राज्य चालवणे खुपच कठीण
सुज्ञ नागरिकांना समजलं पाहिजे.

२४९)
कर भरणारे कमी लाभार्थीच जास्त
मध्यमवर्गिय मात्र पिसला आहे .
करदात्यांच्या संपतीवर सरकारने
कष्टाविना फुकटा पोसला आहे .

२५०)
मजूर मिळेनात शेतीसाठी एकीकडे
रोजगार नाही ही दुसरीकडे बोंब आहे.
रोजगार हमी योजना राबवावी शेतीमध्ये
मनात फुटलेला आशेचा एक कोंब आहे .

२ ५१)
कर्ज,व्याज अणि विविध कर
कुणाला मुळीच नाही  द्यायचं आहे .
सगळ्या सुविधा मात्र तत्पर हव्यात 
अनुदानही प्रत्येकालाच घ्यायचं आहे . 

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

No comments:

Post a Comment