ओढ
शृंगारलेली वनराई
किनारी नाचते नटून
सागरालाही मोह होतो
यावे एकदा भेटून
किती दिवस बसायचे
फक्तच जवळ खेटून
सांगावे तिला मनातील
गुपित एकांत गाठून
सरसावून पुढे जातो
येतो नुसताच स्पर्शून
लाजून तो परत येता
उड्या मारतो हर्षून
नेहमीचा हा खेळ चाले
कधी न गेला थकून
युगे युगे किती सरली
हे प्रेम तयांचे बघून
©जयवंत जाधव,कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मो 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा