बालकविता -सोनीची शाळा
नको नको शाळा ती
नको तिथली गचडी
रोज रोज खायाला
तिच तिच खिचडी
बाईंची आमच्या त्या
असे सदा वट वट
रोज रोज धोकंपट्टी
म्हणे करा पट पट
नुसताच अभ्यास
नसतोच कधी खेळ
जाता जात नाहीच
माझा शाळेतला वेळ
रोज तिच पुस्तके
नि त्याच त्याच वह्या
अभ्यास चुकला म्हणे
आणा पालकांच्या सह्या
तेच तेच कारण
नि तिच तिच शिक्षा
तुरुंगवासही बरा
आमच्या शाळेपेक्षा
त्याच त्याच प्रार्थना
नि त्याच त्याच बाई
मी आजपासून मुळी
शाळेला जाणार नाही
म्हणते सोनी आईला
येऊन लाडात थोडी
तुझ्या सारखी बाईंना
नाही माया,लाडीगोडी
श्री. जयवंत जाधव, कोवाड
मोबा. 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा