शनिवार, २५ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १०१ १०२

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१०१ )

मांडलिक झाले प्यादी,वजीर
आता राजानाही पटले आहे.(?)
'बुद्धी','बळा'च्या सारीपाटावर त्यानी
राजधानीचे तख्त गाठले आहे.

१०२)

आचारसंहितेच्या आधीच सारे
नाक्या नाक्यावर नारळ फोडत आहेत.
गल्लीबोळातल्या कॉर्नर सभात
'ते' भाषणे आपली झोडत आहेत.

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १०३ १०४

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१०३ )

सत्ते शिवाय तडफड यांची
खुर्चीत अडकला 'आत्मा' आहे.
"सत्तेसाठी कायपण " आणि
नितिमत्तेचाही 'खात्मा ' आहे.

१०४)

गल्लीपासुन दिल्लीपर्यंत
फक्त दलबदलूनाच संधी आहे.
लबाडांचीच इथे चलती
आणि प्रामाणिपणाला मंदी आहे.

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे १०५ १०६

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१०५ )
दिसतं ते राजकारणात 
सारंच खरं असत नाही.
मानवा आडच्या दानवाचा
चेहरा काही दिसत नाही.

१०६)

कशाला इतका आटापिटा ?
गोष्ट अगदी साधी आहे.
प्रत्येकाच्या स्वप्नात इथे
'आमदार' पदाची गादी आहे.


         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे १०७ १०८

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१०७)


" पेरले तेच उगवले " पाहून
'जाणताराजा' खुप 'दुःखी' आहे.
त्यांचीच पळवली ' बेणी ' आता
यांच्याही नशीबी तेच 'बाकी' आहे.
                                              .
२०८) 


'ठोशावर ठोसे ' फक्त जनतेसमोर
आतून टाळीवर टाळी वाजवत आहेत.
दोघांच्याही पाठीवर 'सत्तेची खाज' 
म्हणून एकमेकांची पाठ खाजवत आहेत.


         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे १११ ११२

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१११ )
विधानसभेच्या निवडणूकीचा
बिगुल आता वाजला आहे..
सर्व इच्छुकांना शुभेच्छा ज्यानी
महाराष्ट्राचा विकास योजला आहे...

११२)


बोले तैसा चाले अशानाच
नक्की मिळणार 'बॅकअप' आहे.
बोलाचा भात बोलाची कडी
अशांच ठरलंय 'पॅकअप' आहे.

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ११३ ११४

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

११३)

क्रुर, निष्ठूर राक्षसही आता
अगदी देवा सारखे वागणार आहेत.
अहंकार, स्वार्थ, घमेंड लपवून
साळसुदपणे मते मागणार आहेत.

११४)
खा प्या मजा करा आता
सारं काही फुकट आहे.
निवडणूकीनंतर प्रत्येक नेता
दमडीलाही चिकट आहे

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ११५ ११६

*वात्रट ठोसे*
  (वात्रटिका)

११५)

काम ना धाम तरी कोट्याधीश
दिसतोय लख्ख 'आरसा' आहे.
परंपरेने यांच्या भ्रष्टाचाराचा हा
चालून आला 'वारसा' आहे.

११६)

भ्रष्टाचार आणि तुरुंगवारीची
ना मुळीच त्यांना लाज आहे.
कार्यकत्यांच्या अंध निष्ठेमुळे
अशा नेत्यांचा वाढला माज आहे.


         ©जयवंत जाधव, कोवाड
         ता. चंदगड जि. कोल्हापूर
         मोबाईल  9403463881